Posts

असा ट्रेक पुन्हा झालाच नाही... रायगड परिक्रमा (१९९०) - भाग २

… … पुन्हा पुढे चालू … … रात्री झोपही पटकन लागली. खरंतर डास खूप त्रास देत होते पण शरीर प्रचंड थकलेलं होतं. त्यामुळे जेंव्हा पहाटे आम्हाला उठवलं तेंव्हा वाटलं की अरे आत्ताच तर झोपलो होतो. लगेच कशाला उठवलं? तेंव्हा आम्हाला सांगितलं की तुम्ही सर्वात शेवटी उठलाय आणि बाकीचे आधीच उठून तयार झालेत. झालं. पटकन उठलो आणि झटपट प्रातःविधी उरकून घेतला. अंघोळीचा प्रश्नच नव्हता कारण पाण्याची फारशी सोय नव्हतीच. जे काही थोडं पाणी मिळालं त्यात हातपाय आणि तोंड धुवून , कपडे चढवून तयार झालो. आम्ही परत इथेच येणार होतो म्हणून बॅगेत फक्त पाण्याची बाटली तेवढी घेतली. बाकीचे खाद्यपदार्थ घेण्यास मनाई होती. कारण तेच. मीठ घातलेले पदार्थ ट्रेक मध्ये खायचेच नाहीत. खोलीतून बाहेर पडलो आणि ग्राऊंडवर हजर झालो. चहाचं आधण आणि प्रत्येकी दोन दोन पार्ले जी ची बिस्किटे दिली. तेवढ्याने काहीच होणार नव्हतं. पण चहा मिळाल्याचं थोडं समाधान होतंच. सभासदकाकांनी आम्हाला त्यांच्याकडील अजून थोडी बिस्किटे दिली. त्यामुळे थोडं बरं वाटलं. एक दोन बॅच पुढे गेल्या होत्या. शेवटी आमची बॅच म्हणजे जे रात्री रायगडावर जाऊन आलेल्यांची बॅच. आम्हाला स...

असा ट्रेक पुन्हा झालाच नाही... रायगड परिक्रमा (१९९०) - भाग १

१२वी ची नुकतीच परीक्षा झाली होती. अगदी आठवडाही झाला नसेल. पण सतत अभ्यास आणि सलग पेपर्स देण्यात फेब्रुवारी आणि मार्च चा अर्धा महिना कसा गेला ते कळालंच नाही. पेपर्स असेतसेच गेलेले. रिझल्ट मिळाल्यावरच पुढील शिक्षणाची दिशा नक्की होणार होती. पण परीक्षा झाल्यावर ते रिझल्ट मिळेपर्यंत काय? हा प्रश्न माझ्यासहित घराच्या सगळ्यांनाच! दरवर्षी परीक्षा झाल्यावर मी आणि संदीप (शिंदे) एक तरी इंग्लिश तोही ऍक्शन असलेला सिनेमा हमखास बघायला जायचो. तो ही बघून झाला होता. मग काही खटाटोप चालूच होते.  तेंव्हा अभिजित (सभासद) घरी येऊन आम्हाला रायगड परिक्रमा बद्दल माहिती देऊन गेला. ट्रेकिंगची आम्हाला चटक लागलीच होती. यावेळी हा ट्रेक मात्र दोन दिवसांचा होता. त्याची फी साधारण ₹१००/- च्या आसपास काहीतरी होती. वडिलांनी पैसेही दिले. यावेळी सुद्धा  काहीही आढेवेढे घेतले नाहीत. सभासदकाका सोबत असणार होते म्हणून होकार दिला. पण हा ट्रेक मात्र शाळेच्या परीक्षा संपल्यावर होता म्हणजे एप्रिलमध्ये. साधारण तिसऱ्या आठवड्यात. तेंव्हा एक चांगलं होतं राव! परीक्षा अगदी आठदहा दिवसांत संपायची. उगाच ताणून वेळ काढुपणा तेंव्हा...

माझा पहिलावहिला (??) ट्रेक.(१९८८). पन्हाळा गड परिक्रमा

माझा पहिलावहिला ट्रेक. (१९८८). पन्हाळा परिक्रमा भ्रमण.   रामदास त्याच्या ट्रेकिंग चं वर्णन ब्लॉग मार्फत लिहितोय.  थोडं मलाही वाटलं की आपणही जी काही छोटी छोटी ट्रेक केलेत त्याबद्दल लिहावं. पण कसं? अशावेळी नेमकं सुचत नाही.  मी मात्र त्याला सल्ले देतोय आणि मलाच लिहिताना कळतंय की नेमके शब्द कुठेतरी दडी मारून बसतात. मनाचा थोडा हिय्या करून लिहायला बसलं की मग शब्द हळूहळू सुचायला लागतात. आताही तसंच होतंय. म्हटलं, आपणही आपल्या पहिल्या ट्रेकपासून लिहायला सुरवात करू.  मी अकरावीत असेन. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर १९८८. कॉलेजला दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या. हापचड्डीतून फुल पॅंटेत गेलेलो. शाळेचं दप्तर सोडून आता प्लास्टिकच्या पिशवीतून वह्या न्यायचो. एवढाच काय तो बदल झालेला.  सुट्टीत मोकळाच वेळ असल्याने नेहमीचे उद्योग (खटाटोपी पणा आणि घरच्यांना त्रास) चालू होते. तेंव्हा कॉलनीतील सभासदकाकांनी पन्हाळा परिक्रमा भ्रमण, याबद्दल माहिती दिली. आज आपण याला ट्रेकिंग म्हणतो. ते स्वतः, त्यांचा मुलगा अभिजित आणि छोटी मुलगी अस्मिता, हे तिघेही जाणार होते. मग मी आणि संदीप (शिंदे. माझ...